breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आदर्श पुरस्कार मिळणार कधी ? गुणवंत शिक्षकांचा सवाल

पिंपरी –  पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या शिक्षक विभागाने अद्याप आदर्श शिक्षक व आदर्श शाळांची यादी जाहीर केली नाही. सलग दोन वर्षांपासून प्रशासनाच्या अनियोजनबद्ध कारभारामुळे शिक्षकदिनी पुरस्कार मिळत नसल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

महापालिका व खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या अधिक आहे. यातूनच उत्कृष्ट व वेगळे काम करणाऱ्या शिक्षकांना महापालिकास्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात शिक्षकांकडून प्रस्ताव मागवले जातात. त्यांची छाननी केल्यावर पाच सप्टेंबरपर्यंत ७० ते ८० आदर्श शिक्षकांची यादी जाहीर केली जायची. परंतु सलग दोन वर्षांपासून यात विलंब होत आहे. गेल्या वर्षी शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यामुळे यादी जाहीर केली नव्हती. या वर्षी शिक्षण समितीची स्थापना करूनही अद्याप मुहूर्त सापडला नाही. यंदा शिक्षण विभागाकडे ६३ शिक्षक व १० शाळांचे प्रस्ताव आले आहे. त्यांची छाननी सुरू आहे. शिक्षकांसाठी २१, शाळांसाठी १४ व बालवाडी शिक्षकांसाठी १० निकष ठेवले आहेत. शिक्षक दिन आला तरी या निकषांनुसार गुणदान देण्याचे काम सुरू आहे. या वर्षी प्रस्ताव कमी आले आहेत. तसेच पुरस्कार वितरणाची तारीख निश्‍चित झालेली नसल्याचे शिक्षक विभागाने सांगितले आहे.

आदर्श शिक्षक निवडीबाबत प्रस्ताव मागवले आहेत. त्यावर काम सुरू आहे. निकषांची पूर्तता करणाऱ्या शिक्षकांची निवडी केली जाणार आहे.
– ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button