breaking-newsपुणे

अखेर ‘गरवारे’त झाली सत्यनारायण पूजा

पुणे –  गरवारे महाविद्यालयात ए. व्ही. हाँलमध्ये सत्यनारायणाची पुजा आज (ता. 5) पार पडली. सत्यनारायणाची पुजेला मोजक्याच मंडळींना प्रवेश देण्यात आला होता. तसेच सर्व संघटनांना गेटवर उभे राहण्यास सक्त मनाई करण्यात आली होती

पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजा करण्याचा प्रकार घडला. शैक्षणिक संस्थेत झालेल्या कर्मकांडाच्या या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण चांगलेच तापले होते. शैक्षणिक संस्थेच्या आवारात अशा पद्धतीची पूजा घालणे कितपत योग्य आहे, असा सवाल करत काही संघटनांनी याला विरोध केला. त्यामुळे महाविद्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

फर्ग्युसन महाविद्यालयानंतर नंतर असताना आबासाहेब गरवारे कॉलेज सत्यनारायणाची पूजा होणार अशी अशी चर्चा सुरु होती. त्यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या मुक्तजा मठकरी यांनी सत्यनारायण पूजेला स्थगित दिल्याचे जाहिर केले होते. तसेच महाराष्ट्र एक्युकेशन सोसायटीकडून मार्गदर्शन येईपर्यंत स्थगित कायम असेल असे देखील सांगितले होते.

”स्थगित असताना एवढा पूजा करण्याचा हट्टहास का?” असा प्रश्न उपस्थित करत लोकतांत्रिक जनता दल प्रदेशाच्या वतीने गरवारे महाविद्यालयातील सत्यनारायण पुजेचा निषेध करण्यात आला. यापार्श्वभूमीवर आता प्राचार्या मठकरी यांनी सत्यनारायण पुजेला परवानगी मिळाल्यानंतर गरवारे महाविद्यालयात सत्यनारायणाची पुजा झाल्याचे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button