breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus:जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 61 लाखांवर

मुंबई : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास 61 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये जवळपास दीड लाख नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 24 तासात 4,454 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण  61 लाख 53 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 70 हजार 870 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 27 लाख 34 हजार रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 74 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 43 लाखांच्या घरात आहे.

वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात दहाव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे  1 लाख 81 हजार रुग्ण आहेत. तर 5185 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 90,320अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 86,984 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button