breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपा पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकारिणीचे मजबुतीकरण!

उपाध्यक्ष, चिटणीसपदी नव्याने १४ जणांचा समावेश

शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची मोर्चेबांधणी

पिंपरी । प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी मजबूत करण्यावर शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी भर दिला आहे.

उपाध्यक्ष आणि चिटणीस अशा पदांवर आणखी १४ जणांना संधी देण्यात आली आहे. तसेच, नवोदित पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ध्येय-धोरणे, महापालिका प्रशासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृतीशील उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहनही शहराध्यक्ष लांडगे यांनी केले आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :

उपाध्यक्ष :

रवींद्र नांदूरकर, प्रकाश जवळकर, किसन बावकर, पोपट हजारे, विनोद मालू.

चिटणीस :

घनश्याम माने, छाया पाटील, देवदत्त लांडे, राजेंद्र ढवळे, राधिका बोर्लीकर, अपर्णा मणेरीकर, सौरभ धुळेकर.

कार्यकारिणी सदस्य :

गणेश वाळुंजकर, समीर जवळकर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button