breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे – मुंबई महामार्ग राष्ट्रवादी काॅंग्रेसने रोखला, भाजप सरकार विरोधात निदर्शने

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसने जूना पुणे – मुंबई महामार्गावर ठिय्या मांडून रोखला आहे. तसेच भाजप-शिवसेना सरकार सुडबुध्दीने कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

पुणे – मुंबई महामार्ग राष्ट्रवादी काॅंग्रेसने रोखला, भाजप सरकार विरोधात निदर्शने

पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात आज (बुधवार) राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने भाजप सरकार विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. या आंदोलनात शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, विशाल वाकडकर यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, महिला नगरसेविका, युवक व युवती राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून बारामतीत आज, बुधवारी बंद पाळण्यात आला आहे. पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button