breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आज गडचिरोलीत भाजपचा महामोर्चा, ओबीसी आरक्षणासह…

गडचिरोली |

विविध विषयांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने आज गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, ओबीसी आरक्षण व इतर प्रश्नांवर गडचिरोलीत आजा हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या महाजनआक्रोश मोर्चात सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते, आमदार रामदास आंबटकर, किसन नागदेवे गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष, आमदार देवराव होळी, कृष्णाजी गजबे, राजे अमरीशराव आत्राम, अरविंद पोरेड्डीवार भाजप नेते, बाबुराव कोहळे हे भाजप नेते उपस्थित राहणार आहेत. या मोर्चासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. गडचिरोली-चंद्रपूर रस्त्यावरील अभिनव लॉन येथे सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जाणार आहे. जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० हजार नागरिक त्यात सहभागी होतील, अशी माहिती या अगोदरच भाजपने दिली होती.

  • काय आहे मागण्या

१) शेतकऱ्यांच्या धानाला १ हजार रुपये प्रतिक्विंटल बोनस देण्यात यावे

२) कृषिपंपांना २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा

३) कृषी पंपाची व गरिबांची वीज कोणत्याही परिस्थितीत कापण्यात येऊ नये

४) शेतकऱ्यांना घोषित केलेल्या कर्जमाफीची व अनुदानाची रक्कम देण्यात यावी

५) शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी

६) अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळवारा, रोग-किडी मुळे शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची एकरी १० हजार रुपये प्रमाणे मदत देण्यात यावी

७) रब्बी पिकांसाठी जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे

८) दहशतवाद्यांना पैसे पुरविणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा

९) एसटी कामगारांच्या समस्या निकाली काढून सर्व सामान्य लोकांसाठी नियमित बससेवा सुरू करण्यात यावी

१०) प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र ड मधून वगळण्यात आलेल्या गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करावे

११) घरकुलासाठी राज्य सरकारने लावलेल्या जाचक अटी रद्द करण्यात यावी

१२) अल्पवयीन मुली व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात कठोर पावले उचलावी

१३) राज्यात होत असलेल्या नवनवीन घोटाळ्यांची व भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी

१४) गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना लाभ होईल असे १९ टक्के आरक्षण पूर्ववत करण्यात यावे

१५) बंगाली समाज व झाडे, झाडीया समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा

१६) मंजूर विकास कामांचा निधी न मिळाल्याने अपूर्णावस्थेत असलेल्या कामांच्या पूर्ततेसाठी तातडीने थकित निधी उपलब्ध करून द्यावी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button