breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तीन महिन्यांच्या बाळावर जबड्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

एका तीन महिन्याच्या बाळाला जन्मजात जबड्याचा दुर्मिळ आजार जडला होता. या शिशुचे दोन्ही जबडे एकमेकांना चिकटलेल्या अवस्थेत असल्याने तोंड पूर्ण उघडता येत नव्हते. अन्न चघळता येत नाही, तो बोलू शकत नाही, भविष्यात ती एक विसंगती ठरू शकते. हे पाहता चिकटलेले जबडे एकमेकांपासून वेगळे करणे गरजेचे होते. तसेच बाळाचे श्वसन व अन्न मार्गात कोणताही इजा व अडथळा न येता त्याचे आरोग्य जपत ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान डॉक्टरांनी यशस्वी केली आहे.

या बालकावर अवघड शस्त्रक्रिया व उपचार पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या मुख शल्य चिकित्सा विभागात करण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी बाळाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व तपासण्या करण्यात आल्या. तसेच लहान बालकास भूल देणे हे ही एक आव्हानात्मक होते. फायबर ऑप्टिक इंट्युबेटिंग लॅरीनोस्कोप आणि गाईडवायर या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडण्यात डॉक्टरांना यश मिळाले. या संपूर्ण प्रक्रियेसाठी दोन तासांचा अवधी लागला. या उपचारांना पाच दिवसातच बाळाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचे तोंड पूर्ण पणे उघडत असून ते अन्न पाणी प्राशन करू लागले आहे आता इतर बालकांप्रमाणे ते ही निरोगी जीवन जगू शकते.

या शस्त्रक्रियेसाठी मुख शल्य चिकित्सक डॉ संतोष एस. एन, डॉ. लक्ष्मी शेट्टी, डॉ.त्रिविणा याचे मोलाचे योगदान होते. मुख शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. पुष्कर वाकनिस यांचे मार्गदर्शन लाभले तसेच डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय रुग्णालयाचे सहकार्य मिळाले असून भूलतज्ञ बिग्रेडियर डॉ. विपुल शर्मा, डॉ. संदीप जुनघरे, डॉ. शिवानी या तज्ज्ञांच्या टीमने यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. रुग्णालयातील जागतिक दर्जाच्या सेवासुविधा व अद्ययावत तंत्रज्ञानमुळे हे शक्य झाले असे डॉक्टरांनी नमूद केले.

बालकांच्या पालकांनी भावनिक साद घालत डॉक्टर्स व व्यवस्थापनाचे तोंड भरून प्रशंसा केली व आभार व्यक्त केले यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंदभाव झळकत होता. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. डी. गोपालकृष्णन यांनी या यशस्वी उपचाराबद्दल यात सहभागी सर्व डॉक्टर, परिचारिका इतर कर्मचारी वर्गाचे कौतुक केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button