breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू; अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार

राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला होणार सुरुवात

मुंबई : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. सकाळी 11 वाजता सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत.

1 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. त्याचवेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. महागाई, चिनी सैन्याची घुसखोरी, बीबीसी डॉक्युमेंट्री, काश्मिरी पंडितांची सुरक्षा, राम रहीमचा पॅरोल, हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि अदानी या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांचा पक्ष, AAP, केसीआर यांचा पक्ष BRS सह अनेक विरोधी पक्ष राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकू शकतात असं बोललं जात आहे.

दरम्यान, आर्थिक सर्वेक्षण तयारी करण्याची जबाबदारी मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या आर्थिक विभागाकडे असते. आर्थिक सर्वेक्षण अहवाल सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या देखरेखीखाली तयार केला जातो.

आर्थिक सर्वेक्षणात देशाच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा केंद्र सरकारकडून दिला जातो. या दस्तऐवजाच्या माध्यमातून देशाची आर्थिक स्थिती कशी आहे? याशिवाय देशाची आर्थिक स्थिती किती वेगाने प्रगती करत आहे? याचीही माहिती दिली जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button