breaking-newsमहाराष्ट्र

डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्रात पायाभूत सुविधा तयार – मुख्यमंत्री

मुंबई : डिजिटल उद्योग व डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे सध्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. महाराष्ट्राने यापूर्वीच डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. ड्रायपोर्ट, समृद्धी महामार्ग, मेट्रो, रस्ते आदींच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत निर्माण करत आहोत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्याने रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये सेवा क्षेत्र हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राज्याच्या सकल उत्पादनात सेवा क्षेत्राचा वाटा हा ४९ टक्के असून २०२५ पर्यंत तो आम्ही ६५ टक्क्यांवर नेणार आहोत. राज्यात मोठया प्रमाणत मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्याचा योग्य वापर सेवा क्षेत्रात करण्यात येणार आहे. उद्योगासाठी वेगवेगळ्या पॉलिसी जाहीर केल्या आहेत. त्यातील फिनटेक धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र व मुंबईच्या भौगोलिक स्थानामुळे सर्व प्रकारच्या सेवा देणारे मोठे केंद्र झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button