breaking-newsराष्ट्रिय

मोदींमुळे दहशतवाद्यांना मोकळं रान: राहुल गांधी

मी खोटी आश्वासनं देत नाही, असे सांगत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. मध्य प्रदेशमध्ये सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राफेल करारासंदर्भात सीबीआयचे संचालक चौकशी करणार होते, यातून ‘दूध का दूध, पानी का पानी’ झाले असते. ‘चौकीदार’ चोर आहेत हे देशाला कळलं असतं. त्यामुळेच मोदींनी रात्री दोन वाजता सीबीआयच्या संचालकांना हटवले, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सोमवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. उज्जैनमधील मंदिरात दर्शन घेतल्यावर राहुल गांधींनी सभा घेतली. या सभेत त्यांनी नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारवर टीका केली. मध्य प्रदेशमधील कुंभ मेळ्यात भ्रष्टाचार झाला असून त्याच्या सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. पण सीबीआय चौकशी कशी करणार?, त्यांच्या संचालकांना रात्री दोन वाजता पदावरुन हटवले जाते, असे त्यांनी सांगितले.

सीबीआयचे संचालक राफेल करारातील घोटाळ्याची चौकशी सुरु करणार होते. यातून सत्य जनतेसमोर आले असते. यामुळे घाबरलेल्या चौकीदाराने तडकाफडकी संचालकांची बदली केली. ज्या दिवशी चौकशीला सुरुवात झाली असती त्याच दिवशी देशाला चौकीदार चोर आहे हे समजले असते, असा दावा त्यांनी केला.

शिप्रा नदीच्या सफाईवर ४०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण त्या नदीची अवस्था पाहा. मध्य प्रदेशमधील मंत्रीही जर नदीतील पाणी प्यायले तर ते आजारी पडतील, असेही राहुल गांधींनी सांगितले. मध्य प्रदेशमधील जनतेला बदल हवा असून हा बदल फक्त काँग्रेसच घडवू शकते. मी खोटी आश्वासनं देत नाही. सत्तेवर आल्यास मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. जर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ण केले नाही तर त्यांच्या जागी दुसरे मुख्यमंत्री आश्वासन पूर्ण करतील, असेही त्यांनी सांगितले. मोदींनी सुरक्षा दलांसाठी काय केले, पंचायती राज संपुष्टात आणले, जम्मू- काश्मीरला पेटवून दिले, दहशतवाद्यांसाठी दार उघडले, अशी टीकाही त्यांनी केली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button