breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपसाठी मावळ लोकसभेची आशा मावळली, शिवसेनेकडून जागा सोडण्यास नकार -आमदार लक्ष्मण जगताप

  • युती धर्म पाळणार, तरीही अर्ज भरेपर्यंत मावळ-शिरुरचा दावा राहिल

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभा निवडणूक लढविण्यास तीव्र इच्छुक असलेले चिंचवडचे आमदार तथा भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी मावळ लोकसभेची जागा सोडण्यास शिवसेना तयार नसून ही जागा भाजप मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मावळ लोकसभेवरील भाजपची आशा संपुष्टात आली असून लोकसभा निवडणुकीत मी युतीचा धर्म पाळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अर्ज भरेपर्यंत मावळ आणि शिरुर जागेवर आम्ही दावा सोडणार नसल्याचेही त्यानी म्हटले आहे. 

मावळ लोकसभा मतदार संघ भाजपला सोडण्यात यावा, याकरिता आमदार लक्ष्मण जगताप यांचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवकांसह सर्मथकाकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी मागणी नगरसेवकांनी केली होती.

यासंर्दभात आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, ” मावळ लोकसभा मतदार संघ सोडायला शिवसेना तयार नाही. त्यामुळे मतदार संघ मिळण्याची शक्यता कमी आहे. निवणुकीत मी युतीचा धर्म पाळणार आहे. तसेच मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघावरील उमेदवारी अर्ज भरेपर्यंत दावा सोडणार नाही ” असेही ते म्हणाले. तसेच  शिवसेनेने महापालिकेच्या सत्तेत सहभाग मागितल्यास त्यांना सहभागी करून घेण्यात येईल. महापालिकेत अनेक विषय समित्या आहेत, त्यात त्यांना संधी दिली जाईल, असेही जगताप यांनी सांगितले.

दरम्यान, महापालिकेच्या स्थायी समितीत पाच वर्षात किमान 55 नगरसेवकांना संधी देण्यात येईल, त्यामूळे स्थायी समितीवर प्रत्येकाला एक-एक वर्षी संधी दिली जाईल, असे धोरण ठरलेले होते. मात्र, यंदा हे धोरण पक्षाने मोडण्यात आले आहे. यावेळी कोणाचेही राजीनामे घेतलेले नाहीत. यावर  “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारून राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल. असे जगताप यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button