breaking-newsआंतरराष्टीय

नीरव मोदीने घातलेल्या जॅकेटची किंमत वाचून थक्क व्हाल

पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये असून एकदम ऐशो आरामात जगत आहे. वेस्ट एंड येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये नीरव मोदी वास्तव्य करत आहे. द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, नीरव मोदीने लंडनमध्ये हिऱ्यांचा नवा व्यवसाय सुरु केला आहे. नीरव मोदीला आम्ही शोधले असून तो वेस्ट एन्ड लंडनमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचेही टेलिग्राफने म्हटले आहे. नीरव मोदीचा व्हिडीओही यासोबत जारी करण्यात आला असून अत्यंत बिनधास्तपणे लंडनमधील रस्त्यांवर फिरताना दिसत आहे.

व्हिडीओत नीरव मोदीने एक जॅकेट घातलेलं दिसत आहे. या जॅकेटची किंमत कमीत कमी दहा हजार पाऊंड म्हणजेत नऊ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास दोन मिनिटांच्या व्हिडीओत पत्रकार वारंवार नीरव मोदीला प्रश्न विचारत त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांसंबंधी विचारणा करत आहे. मात्र नीरव मोदी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही. दरवेळी नीरव मोदी ‘नो कमेंट्स’ इतकीच प्रतीक्रिया देतो.

भारतीय बँकिंग क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा (१३ हजार कोटी) सुत्रधार असलेला नीरव मोदी गेल्या वर्षी भारतातून फरार झाला आहे. भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी हरऐक प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नातूनच इंटरपोलने गेल्या वर्षी जुलै महिन्यांत त्याच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही काढली आहे. मात्र, अद्याप नीरव मोदी कोणाच्याही हाती लागलेला नाही.

दरम्यान, नीरव मोदीच्या भारतातील सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक असलेला अलिबाग किहीम येथील बंगलाही प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. समुद्र किनारी असलेला हा बंगला सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन बांधण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी नियंत्रित स्फोटांच्या साह्याने हा बंगला अंशतः जमीनदोस्त करण्यात आला. बंगल्याच्या चारही बाजूने सुरुंग लावण्यात आली होती. पुढील १५ ते २० दिवसांत तो मशिनच्या मदतीने पूर्णपणे पाडण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button