महाराष्ट्रमुंबई

भाजपला स्वबळावर सत्ता

  • जनमत चाचणीचा कौल: महायुती झाल्यास 205 जागा

मुंबई- निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह हरयाणाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मात्र, त्यापूर्वी जनमताचा कल -“सी व्होटर’च्या ताज्या सर्वेक्षणात समोर आला आहे. त्यानुसार, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर भाजपला मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होताना दिसते. विशेष म्हणजे भाजप यंदा 144 जागांसह स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत दिसत आहे.

दुसरीकडे शिवसेनेसाठी सर्वेक्षणाचे कल चिंता वाढवणारे आहेत. गेल्या खेपेस स्वबळावर 63 जागा मिळवणारी शिवसेना यंदाही वेगळी लढल्यास फक्त 39 जागा मिळवेल असे दिसत आहे. मात्र, महायुती झाल्यास शिवसेनेलाही लाभ मिळून 205 जागांसह भाजप-सेना सहज सत्तास्थापन करू शकतील. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला मात्र यंदाही जनता विरोधी बाकांवर बसवणार असल्याचे चित्र आहे.

  • स्वतंत्र लढल्यास –

भाजप – 144
शिवसेना – 39
कॉंग्रेस – 21
राष्ट्रवादी कॉंग्रेस – 20
मनसे – 00
इतर – 64

  • महायुती आणि महाआघाडी झाल्यास

महायुती – 205
महाआघाडी – 55
इतर – 28

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button