breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

अजितदादा… पिंपरी विधानसभा काॅंग्रेस पक्षासाठी सोडा, – मनोज कांबळे

काॅंग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या एकजूटीसाठी एक मतदारसंघ काॅंग्रेसला द्या

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी |

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. काॅंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. मात्र, कोणत्या जागा कोणी लढवायच्या, याविषयी अजूनही चर्चा सुरु आहे. त्यामुळे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघापैकी पिंपरी विधानसभा काॅंग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावा, अशी मागणी काॅंग्रेसचे मनोज कांबळे यांनी केली आहे.

याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीतून झालेला आहे. या शहराचा नावलौकिक जगभर पसरवण्याचे काम आघाडी सरकारच्या माध्यमातून झालेले आहे. देशामध्ये आघाडीचे सरकार असताना जेएनआरयूएम योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत पिंपरी-चिंचवड शहराला देण्यात आली आहे. त्यामुळे शहराचा कायापालट व विकास झालेला आहे. म्हणूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा  मतदार मोठ्या प्रमाणात आहे.

पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचा विचार करताना आपण आघाडी धर्म म्हणून काँग्रेस पक्षाला या शहरातील किमान एक मतदार संघ सोडावा. जेणेकरून आघाडीचे उमेदवार चांगल्या प्रकारे एकोप्याने आणि  मोठ्या मताधिक्क्याने निवडून येण्यास दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जिवाचे रान करतील. तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक आणि पक्षासाठी सातत्याने झटणाऱ्या उमेदवारास प्राधान्य द्यावे.

कोणताही नवीन प्रयोग करायला गेल्यास  या शहरातील जनता योग्य असा प्रतिसाद देईल, असे वाटत नाही. अन्यथा हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला द्यावा. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साथीने  या मतदारसंघांमध्ये विजयश्री खेचून आणून आपले हात बळकट करेल. त्यामुळे पिंपरी मतदारसंघांमध्ये स्थानिक, पक्षाचे कार्यकर्ते यांनाच उमेदवारी द्यावी, तुम्ही दिलेल्या आयात उमेदवारास जनता प्रतिसाद देईल. असे चित्र सध्या शहरांमध्ये दिसत नाही, असे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button