breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शालिनी सिनेटोनसाठी कोल्हापुरात ‘चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन’ ‘काळा दिन’

कोल्हापूर – चित्रपटसृष्टीचीच नव्हे तर कोल्हापूरकरांची अस्मिता असलेल्या शालिनी सिनेटोनची आरक्षित जागा शासनातील कारभारी मंत्री व महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बिल्डरच्या घशात घालून आमची घोर फसवणूक केली आहे. याविरोधात आज, शनिवारी साजरा होणारा ‘चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन’ हा ‘काळा दिन’ म्हणून पाळण्यात आला. आम्ही कायदेशीर लढ्यासह जनआंदोलन उभारू; पण कोणत्याही परिस्थितीत ही जागा वाचवूच, असा निर्धार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले  यांनी व्यक्त केला.

यावेळी उपाध्यक्ष धनाजी यमकर, सतीश बिडकर, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, मिलिंद अष्टेकर यांच्यासह चित्रपट व्यावसायिक उपस्थित होते. मेघराज राजेभोसले म्हणाले, भूखंड माफियांनी कोल्हापुरातील चित्रपटसृष्टीवर घाला घालण्याचे नियोजनबद्ध कारस्थान रचले आहे. त्यांना कायद्याच्या पळवाटा आणि भूखंड मिळवून देण्याचे सगळे मार्ग महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखविले आहेत; तर कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता नगरविकास खात्याचे मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी एकतर्फी निर्णय दिला आहे.

हा प्रकार म्हणजे शासन, प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची मिलिभगत आहे. पण आता आम्ही चित्रपट व्यावसायिक गप्प बसणार नाही. आम्ही सनदशीर, कायदेशीर, प्रसंगी आंदोलन, उपोषण अशा सर्व मार्गांनी लढा देऊन शालिनी सिनेटोन वाचवूच.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button