breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद

कोल्हापूर, – जम्मू काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आलं आहे. कोल्हापूरच्या महागाव गावचे जवान शहीद अतिरेक्यांच्या चकमकीत शहीद झाल्याची घटना 16 डिसेंबरला घडली आहे. जोतिबा गणपती चौगले असं वीरमरण आलेल्या जवानाचं नाव आहे. चौगले हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावचे रहिवासी होते. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

जोतिबा चौगले हे 2009 साली सैन्यदलात दाखल झाले होते. जम्मूमध्ये राजुरी इथं ते कार्यरत होते. आपले कर्तव्य पार पाडत असताना अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत चौगले यांना वीरमरण आलं. उद्या दुपारी महागाव गावात चौगले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर ही बातमी समजताच चौगले घरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या परमेश्वर बाळासाहेब जाधवर या पुत्रालाही वीरमरण आले होते.

राजस्थान जैसलमेर येथे युद्धाभ्यासात जवान परमेश्वर बाळासाहेब जाधवर (वय-26) शहीद झाल्याची घटना घडली होती. परमेश्वर हे धारूर तालुक्यातील घागरवाडा येथील रहिवासी होते. परमेश्वर जाधवर हे 514 वायुसेना रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परमेश्वर यांचे माध्यमिक शिक्षण उमरी (ता.माजलगाव) येथे तर उच्चशिक्षण पिंपळनेर येथे झाले होते. परमेश्वर जाधवर यांची पाच वर्षापूर्वी बीड येथील सैन्य भरतीच्या माध्यमातून भारतीय सैन्यात दाखल झाले होते. सध्या परमेश्व जैसलमेर येथे कार्यरत होते. अत्यंत गरीब कुटुंबाला परमेश्वर हेच एकमेव आधार होते. परमेश्वर यांच्या पश्चात पत्नी दमावंती, दीड वर्षांची मुलगी विद्या, आई, वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button