breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रशांत शितोळेंचा दावा ‘हास्यास्पद’

  • भाजपच्या नगरसेवकाचा राष्ट्रवादीवर पलटवार
  • नगरसेवक तुषार कामठे यांनी डागील तोफ

 पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे 50 नगरसेवक फुटून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील, असे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांना पडू लागले आहे. भाजपचे नगरसेवक फोडण्याचा त्यांचा हा दावा हास्यास्पद असून प्रशांत शितोळे यांनी आधी आपला पक्ष तपासून पाहावा. विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून ज्यांना स्वत:चा एबी फॉर्म घेता येत नाही. ते भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक काय फोडणार ? नगरसेवक काय तर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजपचा एक मंडलाध्यक्षही फुटणार नाही, असे भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी म्हटले आहे. 

राज्यात शिवमहाआघाडीची सत्ता स्थापन होताच भाजपचे 50 नगरसेवक राष्ट्रवादीत परतणार आहेत. भाजपमध्ये असूनही मनाने राष्ट्रवादीशी सलोखा साधून आहेत, असे प्रशांत शितोळे यांनी गुरुवारी म्हटले होते. त्यांच्या या दाव्याला भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नगरसेवक तुषार कामठे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत शितोळे यांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली. परंतु, उमेदवारी अर्ज भरण्याकरिता दोन वेळा जावूनही त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. कारण, त्यांना पक्षाचा साधा एबी फॉर्मही मिळविता आला नाही. उमेदवारी बाद झाल्यानंतर प्रशांत शितोळे यांनी आपल्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेच आता भाजपचे नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहेत.

पक्षाची बदनामी कराल तर याद राखा

ज्याला पक्षाचे दालन नाही. त्यांना इतर पक्षाच्या दालनात प्रेस घ्यावी लागते. त्यांनी भाजपाचे नगरसेवक संपर्कांत असल्याचा दावा ठोकणे हास्यपद आहे. भाजपाचा एक मंडल अध्यक्ष सुध्दा यांच्या संपर्कांत आणून त्यांना फोडता येणार नाही. त्यांच्याकडून नगरसेवक संपर्कांत असल्याच्या गोष्टी केल्या जात आहेत. पक्षात व शहरात राजकीय वजन वाढविण्यासाठी या पध्दतीचे राजकारण शहरात सुरू केले जात आहे. विचाराची लढाई ही विचाराने लढली पाहिजे. निवडणुकीनंतर आपण सर्व हेवेदावे बाजुला ठेऊन शहराच्या विकासासाठी निश्चित एकमेकांबरोबर बोलत असेल किंवा बोललेही पाहिजे. परंतु, तुम्ही त्याचे भांडवल करत आमच्या पक्षाची बदनामी करत असाल, तर कदापी सहन केले जाणार नाही, असा इशाराही नगरसेवक तुषार कामठे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button