breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भांडार विभागाकडून ठेकेदारांवर कृपादृष्टी; 31 लाखांचे फर्निचर साहित्याची थेट खरेदी

दोन ठेकेदार मित्रांना विभागून दिले काम, निविदा प्रक्रिया न राबविता साहित्याची करणार खरेदी

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे यांनी नव्याने प्रथा पाडण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. पालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील फर्निचर साहित्य खरेदीत दोन ठेकेदार मित्रांना विभागून काम देण्यात आले आहे. नव्याने निविदा प्रक्रिया न राबविता सुमारे 31 लाख रुपयांची खरेदी करण्यात येणार आहे. या कामाला आज (बुधवारी) स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.

महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने टेबल, खुर्च्यां, कपाट यासह अन्य फर्निचर साहित्याची मागणी भांडार विभागाकडे केली आहे. तत्पुर्वी वैद्यकीय विभागाच्या विविध प्रकारच्या फर्निचर साहित्याची खरेदी जीईएम वर निविदा प्रक्रिया राबवून करण्यात आली होती. त्यानूसार प्राप्त लघुत्तम पुरवठादार मे. रेखा इंजिनिअरिंग वर्क्स, चिंचवड यांना एकूण 5 बाबींच्या फर्निचर साहित्यासाठी 31 लाख 7 हजार 920 रुपये व मे. निर्मिती इंजिनिअरिंग काॅर्पोरेशन पिंपरी यांना 6 बाबींच्या फर्निचर साहित्यासाठी 31 लाख 37 हजार 937 रुपये पुरवठा आदेश देण्यात आलेले होते. त्यानूसार संबंधित पुरवठादार यांनी आदेशातील नमुद साहित्याचा पुरवठा केलेला आहे.

त्यामुळे भांडार विभागाने नव्याने निविदा प्रक्रिया न राबविता, त्याच ठेकेदारांना पुन्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्या फर्निचर साहित्य खरेदी करण्याचे काम विभागून देण्यात आले आहे. वैद्यकीय विभागाच्या निविदेच्या मंजूर दरानूसार मे. रेखा इंजिनिअरिंग वर्क्स यांना 5 प्रकारच्या फर्निचर साहित्याच्या खरेदीसाठी 15 लाख 52 हजार 610 रुपये आणि मे. निर्मिती इंजिनिअरिंग काॅर्पोरेशन यांचेकडून 6 प्रकारच्या फर्निचर साहित्य खरेदीसाठी 15 लाख 65 हजार 580 रुपये असा एकूण 31 लाख 18 हजार 190 रुपये खर्च येणार आहे.

दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागाने फर्निचर साहित्य खरेदी करण्यासाठी भांडार विभागाने सदरील दोन ठेकेदारांना मागील निविदेच्या दरानूसार काम दिले असून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची तसद्दी घेतलेली नाही. तसेच वरील दोन्ही ठेकेदारासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता घेतलेली आहे.

महापालिकेच्या माध्यमिक शाळांना फर्निचर साहित्य करणे आवश्यक आहे. त्या शाळांच्या मागणीनूसार त्यांचे फर्निचर खरेदी केलेली आहे. मागील दरानूसार ठेकेदारांना काम देताना वाढीव रक्कम न देता केवळ 50 टक्के वाढ देण्यात आलेली आहे. हा विषय एक महिना थांबवून ठेवण्यात आला होता.

विलास मडिगेरी – सभापती स्थायी समिती, महानगरपालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button