breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

गुजरात टायटन्सची विजयाने सुरूवात! चेन्नईवर पाच गडी राखून विजय

आज आयपीएलचे रंगणार दोन सामने

IPL 2023 : आयपीएलच्या १६ हंगामाला काल (३१ मार्च) सुरूवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियअमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात पहिला सामना पार पडला. यामध्ये गुजरातने चेन्नईचा पाच गडी राखून पराभव केला. यासह गुजरात संघाने विजयाने सुरूवात केली.

गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी चेन्नई सुपर किग्ज संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७८ धावा केल्या. पुण्याच्या ऋतुराजने ५० चेंडूत ९२ धावांची खेळी केली. तर मोईन अलीने २३ धावांची खेळी केली. तर धोनीने अखेरच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाची धावसंख्या १७८ पर्यंत नेली.

गुजरात टायटन्स संघाने हे आव्हान १९.२ षटकात ५ विकेट गमावत पूर्ण केले. केन विल्यमसनच्या जागी सुदर्शनला खेळवण्यात आले. त्याचा फायदा करत त्याने १७ चेंडूत २२ धावा केल्या. शुभमन गिलने ३१ चेंडूत ५१ धावा केल्या. तर कर्णधार हार्दिक ८ धावांवर बाद झाला. राजवर्धन हांगरगेकर याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

दरम्यान, आयपीएलमध्ये आज दोन सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना पंजाब किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार आहे. तर दुसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button