breaking-newsआंतरराष्टीय

18 परदेशी एनजीओ’नी 2 महिन्यात देश सोडावा : पाकिस्तान सरकार

इस्लामाबाद (पाकिस्तान)- पाकिस्तान सरकारने 18 परदेशी एनजीओना आपले कामकाज बंद करून दोन महिन्यांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने या 18 परदेशी एनजीओना आपले पाकिस्तानमधील कामकाज बंद करण्यास सांगितले असून त्यासाठी 60 दिवसांची मुदत दिलेली आहे. बंद करण्यास सांगण्यात आलेल्या या 18 परदेशी एनजीओमध्ये 9 अमेरिकन, 3 ब्रिटिश आणि 2 नेदर्लॅंड्‌सच्या आहेत.
बाकी चार एनजीओ इटली, स्वित्झर्लंड, डेन्मार्क आणि आयर्लॅंडमधील आहेत. या 18 एनजीओंबरोबरच अन्य 72 एनजीओंवर अपूर्ण दस्तावेजांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र 66 परदेशी एनजीओंसह 141 एनजीओंना आपले काम चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button