breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भक्ती-शक्ती चाैकातील उड्डाणपूलाला आयुक्तांकडून मुदतवाढ

पिंपरी |महाईन्यूज|

महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकातीस ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूल व वर्तुळाकार रस्त्याचे (रोटरी) काम निर्धारित कालावधीत पूर्ण झालेले नाही. कामाची मुदत 26 डिसेंबर रोजी संपली असून त्या कामास वाढीव मुदतवाढ देण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराला आयुक्तांनी वाढीव मुदत देत मेहेरबानी दाखविली आहे.

पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या भक्ती-शक्ती चाैकात हे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. तेथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी महापालिकेने चौकात उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटर, रस्ता बांधण्याच्या कामास सुरूवात केली आहे. या कामासाठी सुमारे 150 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.

या कामाची वर्क ऑर्डर बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी कंपनीला 27 जून 2017 ला देण्यात आली आहे. कामाची निर्धारित मुदत 26 डिसेंबर संपली आहे. त्यामुळे या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. या संथगती कामामुळे चौकातील वाहतुकीस अडथळा होत असून, दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. मात्र, अनुषंगिक कामे पूर्ण करून या पुलाचे लोकार्पण करण्यासाठी साधारण आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “भक्ती-शक्ती चाैकाच्या उड्डाण पुलाच्या कामाला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. या कामासाठी अडथळा असणारे अतिउच्च दाब विद्युत वाहिनीचे टॉवर हटविण्यात आलेले आहेत. पुढील आठ महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button