breaking-newsपिंपरी / चिंचवड

रावेतच्या लोकवस्तीतील प्रस्तावित स्मशानभूमी अखेर रद्द

पिंपरी |महाईन्यूज|

रावेत येथील सेक्टर क्रमांक 32 परिसर लोकवस्ती आहे. तेथील स्थायिक नागरिकांनी स्मशानभूमीचे काम रद्द करण्यात यावे, याकरिता आंदोलन करुन मोर्चाही काढला होता. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकरांनी लोकाच्या भावना विचारत घेवून नियोजित स्मशानभूमीचे काम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत स्थानिक नगरसेवक प्रज्ञा खानोलकर यांनी पाठपुरावा केला. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत येथील सेक्टर नंबर ३२ च्या लोकवस्तीमध्ये नियोजित स्मशानभूमी काम प्रस्तावित होते.

याबाबत स्थानिक लोकांच्या आग्रहाखातर आजच्या बैठकीमध्ये सर्वानुमते सदरील स्मशानभूमी अन्यत्र करण्याचे ठरविण्यात आले आहे. रावेत येथील सेक्टर क्रमांक ३२ मधील भरवस्तीमध्ये स्मशानभूमीचे काम प्रस्थावित होते. तेथील नागरीकांनी एक वर्षापासून निवेदन, आंदोलन मोर्चे काढून सदर स्मशानभूमीस तीव्र विरोध केला होता. त्या आंदोलनास आज यश मिळाले आहे.

आयुक्तांच्या दालनात सदर स्मशानभूमी संदर्भात मिटींग झाली. या मिटींगमध्ये रावेत प्रभागाच्या नगरसदस्या प्रज्ञा खानोलकर, करुणा चिंचवडे, नामदेव डाके, संगिता भोंडवे व भाऊसाहेब भोईर तर प्रशासनाच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर, अति.आयुक्त अजित पवार, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, सतिश इंगळे, कनिष्ठ अभियंता अंकुश सईजराव हे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button