breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
‘ब्लॅक विडो’ फेम स्कारलेटने केलं गुपचूप लग्न; तिसऱ्यांदा झाली विवाहबद्ध
‘ब्लॅक विडो’ फेम अभिनेत्री स्कारलेट जोहानसनने तिसरं लग्न केलं. अमेरिकन कॉमेडियन कॉलिन जोस्टशी ती गुपचूप विवाहबद्ध झाली. स्कारलेटने या लग्नाची कोणतीच घोषणा केली नव्हती. गेल्या आठवड्यातच तिने अत्यंत खासगी समारंभात लग्न केल्याचं समजतंय.
२०१७ पासून स्कारलेट कॉलिनला डेट करतेय. Meals on Wheels च्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर स्कारलेटच्या लग्नाविषयीची माहिती देण्यात आली आहे. स्कारलेटवर चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.