breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रराजकारण

आव्हाडांचा ताफा येताच पोलीस कर्मचाऱ्याने कारचालकाला मारली चापट; VIDEO व्हायरल

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना घडलेल्या एका घटनेची राज्यभरात जोरदार चर्चा होत आहे. वाहतूक कोंडीमुळे आव्हाड यांचा ताफा अडकल्याने वाट मोकळी करून देताना पोलीस कर्मचाऱ्याने एका कारचालकाला चापट लगावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जितेंद्र आव्हाड कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी आव्हाड हे अंबाबाई दर्शनासाठी निघाले होते. कोल्हापूरच्या भाऊसिंहजी रस्त्यावर जितेंद्र आव्हाड यांचा ताफा पोहोचला. मात्र यावेळी आव्हाड यांच्या ताफ्याला वाट मोकळी करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. आव्हाडांचा ताफा जात असताना अचानक एका चौकात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे गाड्यांना बाजूला हटवताना पोलिसांची एकच धावपळ उडाली. यावेळी संतापलेल्या पोलीस हवालदाराने थेट एका वाहनचालकावर हात उचलला. दरम्यान, वाहनचालकाला मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात आता संताप व्यक्त केला जात असून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button