breaking-newsपश्चिम महाराष्ट्र

बैलगाडी शर्यत भरवल्याप्रकरणी साताऱ्यात 7 जणांवर गुन्हा दाखल

सातारा- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतेही मनोरंजनात्मक कार्यक्रम न करण्याचे व सार्वजनिकरित्या जमून खेळ न करण्याचे आदेश देऊनही नीरसाळे येथे बैलगाडी शर्यतीत सहभागी झालेल्या 7 जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काल सायंकाळी नीरसाळे येथील बेलदार वस्तीजवळ बैलगाड्या शर्यती सुरु असल्याची माहिती सपोनि डॉ. सागर वाघ यांना मिळाली होती. यावेळी पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर यांच्यासह त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच तेथे पळापळ सुरु झाली. पोलिसांनी यावेळी 7 जणांना ताब्यात घेतले. संशयितांना ताब्यात घेताना यातील एकाने त्याच्या दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता महिला उपनिरीक्षक डाळिंबकर यांनी त्याची दुचाकी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुचाकीवरील संशयिताने डाळिंबकर यांना ढकलून दिल्याने त्या जखमी झाल्या. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले असून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आणि अन्य संशयितांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी बाजीराव पायमल यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button