breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जळगाव-रावेरचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे कोरोनामुळे निधन

जळगाव | भाजपचे माजी खासदार आणि जिल्हा अध्यक्ष हरीभाऊ जावळे यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. यावरच उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे. रावेर मतदार संघातील माजी खासदार जावळे यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. माजी मंत्री तसेच भाजप आमदार गिरीश महाजन यांनी ही माहिती दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे.

यावल तालुक्यातील भालोद हे त्यांचे मूळ गाव होते. आठवडाभरापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले होते. उपचार सुरू असतांनाच त्यांच्या मृत्यूची बातमी धडकल्याने जिल्ह्यात शोकाकुल वातावरण आहे. हरिभाऊ जावळे दोन वेळा जळगाव-रावेर मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत. तसेच, रावेरचे आमदारही होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना तिकीट देण्यात आले होते. त्याचवेळी भाजपकडून जावळे यांना तिकीट नाकारले होते. हुशार आणि सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. कापूस शेतकऱ्यांच्या त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button