breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘महाईन्यूजचा गणपती’: मनसे गटनेते सचिन चिखले यांचा संकल्प; प्रभागात विसर्जनरथ सज्ज

  • नागरिकांना घराशेजारीच करता येणार गणेशमूर्तीचे विसर्जन…

पिंपरी-चिंचवड|प्रतिनिधी |

गणेशोत्सव काळात गर्दी होऊ नये किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने सर्व नैसर्गिक विसर्जनघाट बंद केलेले आहेत. त्यामुळे गणेशविसर्जनासाठी नागरिकांना घराबाहेर पडावं लागू नये यासाठी मनसे गटनेते सचिन चिखले यांच्याकडून ‘विसर्जन रथ’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. सध्यस्थितीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ”महाईन्यूज”नेही घेतला आहे. त्यानुसार तुरटीपासून बनवलेली पर्यावरणपूरक गणेश मुर्ती कार्यालयात बसवण्यात आली आहे.त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातील मान्यवरांना गणरायांची आरती करण्याचा मान दिला जात आहे. आजचा आरती करण्याचा मान हा पिंपरी-चिंचवड शहराचे मनसेचे शहराध्यक्ष तथा महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांना देण्यात आला होता. सचिन चिखले यांच्या शुभहस्ते आज गणरायाची पुजा- आरती करण्यात आली.

नागरिकांच्या घरापर्यंत पोहचणार विसर्जनरथ
“ज्या नागरिकांना गणरायाचे विसर्जन करायचे आहे त्यांनी आम्हाला एक फोन करावा त्यांच्या दारी हा ‘विसर्जन रथ’ नक्की पोहचेल”. असं आश्वासनही सचिन चिखले यांनी दिलं आहे.या संकल्पनेमुऴे नागरिकांना आपआपल्या घराशेजारीच ‘श्री’चे विर्सजन करण शक्य होणार आहे. यामुळे नदी पात्रातील निर्माल्य आणि मूर्ती विर्सजनामुळे होणारे प्रदूषण रोखण्यास निश्चित मदत होईल असा विश्वासही चिखले यांनी नागरिकांना दिला आहे.

पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन
“प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गणेशोत्सवासाठी ज्या नियम व अटी लागू केल्या आहेत त्या सर्वांनी पाळल्या पाहिजे. त्याचप्रमाणे विसर्जनासाठीही नागरिकांनी शक्य तेवढी गर्दी टाळावी. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करूनच फिरत्या हौदांचा विसर्जन रथ तयार करण्यात आला आहे .त्यामुळे घराबाहेर न पडता विसर्जनाच्या वेळेस आम्हाला एक फोन करा रथ तुमच्या दारी विसर्जनासाठी सज्ज असेन” असेही यावेळी सचिन चिखले यांनी म्हटले आहे. तसेच सर्व नागरिकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाचे नियम आणि गणेशविसर्जनाचेही नियम पाळावे , स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन सचिन चिखले यांनी महाईन्यूजच्या माध्यमातून नागरिकांना केले आहे.तसेच गणेशोत्सवासाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button