breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

बेस्टच्या ताफ्यात १५०० नव्या बस

मुंबईकरांना बस थांब्यावर प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात मार्च २०२० पर्यंत एक हजार वातानुकूलित लहान बस आणि सीएनजीवर धावणाऱ्या ५०० वातानुकूलित मिडी बस समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ५९० वातानुकूलित इलेक्ट्रॉनिक आणि एक हजार वातानुकूलित एकमजली बससाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती बेस्टने आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या पालिकेला अहवालाद्वारे कळविली आहे.

बेस्ट उपक्रम कर्जमुक्त व्हावा यासाठी पालिकेने १,७३६.३१ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. बेस्ट उपक्रमाने या अनुदानाचा विनियोग कसा केला, असा प्रश्न विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला होता. समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख, भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, शिवसेना नगरसेविका राजूल पटेल आदींनी या संदर्भात काही मुद्दे उपस्थित केले होते. बेस्टने अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी वापरल्याचा आरोप या मंडळींनी केला होता. नगरसेवकांच्या आक्षेपांवरील उत्तर पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या शनिवारच्या बैठकीत सादर केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button