breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

बीड शिवसेना युवा प्रमुख राहूल फरताळे यांच्यावर प्राणघातक हल्ला

बीड | महाईन्यूज

शिवसेना युवा प्रमुख राहुल फरताळे यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला झाला. दिवसाढवळ्या हा हल्ला झाल्याने सारडा नगरी परिसरात खळबळ उडाली. पूर्वी झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगितलं जात आहे. फरताळे यांच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरूवारी (दि. 16) दुपारी राहुल फरताळे त्यांच्या घराकडून शहरात येत होते. सावता माळी चौकाच्यापुढे आल्यानंतर दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी राहुल फरताळे यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यांच्यावर तलवार आणि कुकरीने हल्ला करण्यात आला. राहुल यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. आरडाओरड केल्याने हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. राहुल फरताळे यांचा आवाज ऐकून जमलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

हल्लेखोरांमध्ये खंडू जगताप आणि दादाराव जगताप यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. काही वर्षांपूर्वी जगताप आणि फरताळे यांच्यात वाद झाला होता. कदाचित त्याच वादातून हा हल्ला झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button