breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबई

संजय राऊतांचा दाऊदशी संबंध, तत्काळ जेरबंद करा, राम कदमांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

मुंबई | महाईन्यूज

शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. एवढेच नाही तर गँगस्टर दाऊद इब्राहिम याच्याशी त्यांचे संबंध होते, असा खुलासाही त्यांनी केला आहे. यावर आक्षेप घेत या दोन्ही प्रकरणात राऊत यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. याप्रकरणी कमद यांनी घाटकोपर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.

माझे दाऊद इब्राहिमसोबत संबंध होते असे संजय राऊत म्हणाले होते. त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी मी केली आहे. संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात यावी, असं म्हणत राम कदमांनी घाटकोपर पोलीस स्टेशनच्या परिसरात ठिय्या आंदोलन केलं होतं. संजय राऊतांना चौकशीला बोलावून महाराष्ट्र पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button