breaking-newsमहाराष्ट्र

शिरुर अनंतपाळमध्ये मुस्लीम-धनगर-लिंगायत समाजाचा ऐतिहासिक मोर्चा

लातुर, (प्रतिनिधी) – लातुर जिल्ह्यातील अनंतपाळ तालुक्यातील लिंगायत, मुस्लीम, धनगर या तीन्ही समाजांच्या वतीने विविध प्रलंबीत मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तीन समाजाचा एकत्र मोर्चा निघण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यामध्ये शासनाच्या लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याची यापुर्वी नोंद आहे. स्वतंत्र धर्माच्या बाबतीत लागणार्‍या सर्व अटींची पुर्तता होत असल्याने लिंगायत समाजास स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यात यावी. त्याचसोबत लिंगायत समाजास  अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा देण्यात यावा. मुस्लीम समाजाची संरक्षण व आरक्षण मिळणे,रंगनाथन मिश्र, राजेंद्र सच्चर समीती, महेमदुर रहमान या विविध समीत्यांच्या शिफारसी मान्य करुन मुस्लीम समाजाची परीस्थीती सुधारण्याकरीता विविध स्तरांमध्ये आरक्षण लागु करावे.  सरकारने पहिल्या अधिवेशनामध्ये धनगर समाजास एस. टी. प्रवर्ग आरक्षणाच्या सवलती लागु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार धनगर समाजास लवकरात लवकर एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी शासकिय स्तरावरुन करण्यात यावी.

यासह अन्य प्रमुख मागण्या घेवुन बसवेश्वर चौक शिरुर अनंतपाळ ते तहसील कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांना देण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button