breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“इतिहास पाहून तोंड बंद ठेवावं”; वारीस पठाण यांना विश्व हिंदू परिषदेचा इशारा

पिंपरी-चिंचवड | महाईन्यूज

“वारीस पठाण यांनी केलेले वक्तव्य हे धमकी वजा आहे. त्यांनी भारताचा इतिहास पाहावा आणि तोंड बंद ठेवावं. हिंदूना धमकावल्याच त्याचा चांगला परिणाम होणार नाही,” असे सडेतोड उत्तर विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे यांनी पठाण यांना दिले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त व्क्तव्य केलं होतं. या सभेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि मनसेनं वारिस पठाण यांच्यावर टीका केली आहे.

  • विश्व हिंदू परिषदेचे उत्तर

पठाण यांच्यावर चहूबाजूने टिका होत असतानाच आता विश्व हिंदू परिषदेनेही याप्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परिषदेचे मिलिंद परांडे यांनी वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. “त्यांनी भारताचा इतिहास पाहावा आणि तोंड बंद ठेवावं. हिंदुना धमकावून परिणाम होणार नाही. इतिहास काळापासून जे काही हिंदू समाजावर संकट आली आहेत. त्याची हिंदू समाज चिंता करायला सक्षम आहे,” असा थेट सूचक इशाराच परांडे यांनी वारीस पठाण यांना दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button