breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2021 : स्पर्धा सुरू होण्यापूर्वी फ्रेंचायझींचा चढला पारा..! थेट BCCI कडं केली तक्रार

मुंबई |

आयपीएलचा थरार पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आयपीएल २०२१ साठी सर्व खेळाडू यूएईला पोहोचले आहेत. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मालिका अकाली संपली आहे, त्यामुळे खेळाडू देखील यूएईमध्ये घाईत पोहोचले आहेत. दरम्यान, पहिला सामना खेळण्याआधीच एक मोठी बातमी समोर आली. आयपीएल खेळणाऱ्या इंग्लंडमधील तीन खेळाडूंनी वैयक्तिक कारणास्तव नावे मागे घेतली आहेत. मात्र, यानंतर संघांनी त्यांच्या बदली खेळाडूंची घोषणाही केली. पण या संपूर्ण प्रकरणामुळे संघांसाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि या प्रकरणी त्यांनी बीसीसीआयकडे तक्रारही केली आहे.

इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान आणि ख्रिस वोक्स यांनी शनिवारी आयपीएलच्या या टप्प्यातून अचानक आपली नावे मागे घेतली. इनसाइड स्पोर्ट्सच्या मते या गोष्टीवरून त्यांचे संघ नाराज आहेत. त्यांनी बीसीसीआयला पत्रही लिहिले आहे. ”इंग्लंडच्या खेळाडूंनी गुरुवारीच अशी माहिती दिली होती, की ते आयपीएलचे उर्वरित सत्र खेळण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत यूएईला पोहोचतील. पण पहिला सामना सुरू होण्याच्या आठ दिवस आधी, ते येणार नसल्याचे शनिवारी कळले. ही एक अव्यावसायिक पद्धत आहे. हे कराराच्या विरोधात आहे”, असे संघाने बीसीसीआयला कळवले आहे.

या संपूर्ण प्रकरणावर, एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितले, ”हा काळ कठीण आहे आणि आम्हालाही ते समजले आहे. खेळाडू सतत बायो बबलमध्ये असतात आणि त्यांना मानसिकरित्या थकल्यासारखे वाटते. आम्हाला खेळाडूंबद्दल सहानुभूती आहे. पण त्याचबरोबर खेळाडूंनाही हे समजून घ्यावे लागेल की आपल्यासमोरही अनेक आव्हाने आहेत. अशाप्रकारे, खेळाडूंना शेवटच्या क्षणी आयपीएलमध्ये खेळायला येण्यास नकार देणे हे आणखी कठीण होते.” पंजाब किंग्जने डेव्हिड मलानच्या जागी ऐडन मार्क्राम, सनरायझर्स हैदराबादने जॉनी बेअरस्टोच्या जागी शेरफेन रुदरफोर्डचा समावेश केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button