breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘बिग बॉस १३’ च्या घरातील ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा…सलमान खाननं किचनपासून बाथरुमपर्यंत साफ केलं घर…

‘बिग बॉस १३’ च्या घरातील ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा अजूनही सुरु आहे. या आठवड्यात शहनाज गिलला कॅप्टन्सी मिळाली आणि तेव्हापासूनच घरातील इतर सदस्य साफसफाई आणि घरातील काम करण्यास नकार देत आहेत. याच गोष्टीचा सलमानला राग आला असून त्याने चक्क ‘बिग बॉस’च्या घरी जाऊन भांडी घासली आणि टॉयलेटसुद्धा साफ केलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सलमान किचनपासून बाथरुमपर्यंत बिग बॉसचं घर साफ करताना दिसत आहे.

कलर्स टिव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. घरातील सर्व स्पर्धक एका कॅमेऱ्यासमोर उपस्थित आहेत तर सलमान घरात जाऊन साफसफाई करत आहे. सलमान हे काम करत असताना घरातील स्पर्धक त्याच्याशी माफी मागत आहेत. चक्क सलमान हे सर्व काम करत असताना पाहून स्पर्धकांना ओशाळल्यासारखं झालं. आता यापुढे बिग बॉसच्या घरात अजून काय काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button