breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

सत्कर्म सोशल फाउंडेशन
मदत नव्हे कर्तव्य; गोरगरिबांना व सफाई कामगारांना मिठाई व दिवाळी फराळ वाटप- गणेश जवळकर

पुणे: सत्कर्म सोशल फाउंडेशन च्या वतीने दरवर्षीप्रमाणे कासारवाडी येथे या वर्षी देखील एक सामाजिक जाणीव म्हणून गोरगरीब गरजू वारकरी मंडळीना तसेच सफाई कामगारांना दिवाळीचा फराळ, मिठाई तसेच थंडी पासून बचाव व्हावा म्हणून सोलापुरी चादर भेट स्वरूपात देण्यात आलेली आहे. यावेळी सत्कर्म सोशल फाउंडेशनचे कार्याअध्यक्ष व सचिव गणेश बबन जवळकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्य करत आहे.

समाजातील काही उपेक्षित घटक आहेत त्यांना परिस्तिथी मुळे म्हणा अथवा समाजाला अत्यआवश्यक सेवा देत असल्या कारणाने दिवाळी साजरी करता येत नाही. अशा घटकां सोबत आपण दिवाळी साजरी करून तो आनंद आपण त्यांना देऊ शकतो. यावेळी योगेश जवळकर,शशिकांत शेडे ,ऋषिकेश जवळकर,सुशांत माने,संजय बनै ,शुभम जवळकर, ओंकार गोरडे, विशाल शेलार, रणवीर जवळकर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button