ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

‘बंटी और बबली 2’ साठी राणी मुखर्जी आणि सैफ अली खानची जोडी फायनलं.

मुंबई |महाईन्यूज |

राणी मुखर्जी आणि सैफ अली खान पुन्हा एकदा सिल्वर स्क्रिन शेअर करणार आहेत. लवकरच ही जोडी ‘बंटी और बबली 2’ मध्ये दिसून येणार आहे. यश राज फिल्मचा आगामी चित्रपट ‘बंटी और बबली 2’ची घोषणा करण्यात आली असून याच चित्रपटातून राणी आणि सैफची जोडी तब्बल अकरा वर्षांनी स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटात राणी आणि सैफसोबतच सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरीही लीड रोलमध्ये दिसणार आहे.

बंटी और बबली या चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिषेक आणि राणीची जोडी जबरदस्त हीट झाला होती. मात्र या चित्रपटाच्या दुस-या भागासाठी अभिषेक ऐवजी आता सैफ अली खानची निवड करण्यात आली. बिझी शेड्यूलमुळे अभिषेकने याचित्रपटाला नकार दिल्याचं सागंण्यात येतं आहे. त्यानंतर राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांची जोडी फायनल करण्यात आली.

दरम्यान, हा चित्रपट राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आलेला ‘बंटी और बबली’चा सीक्वल आहे. सैफ अली खानने बोलताना सांगितले की, ”बंटी और बबली 2’ सध्याच्या परिस्थितीवर आधारित आहे. हा एक वेगळाच सीक्वल असणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टने मला खरचं प्रभावित केलं आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहण्याचा हा चित्रपट आहे. याच कारणामुळे मला स्क्रिप्ट आवडली आणि मी लगेच या चित्रपटासाठी होकार दिला.

रानी मुखर्जीने या चित्रपटाबाबत बोलताना सांगितले की, ‘पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांची फार पसंती मिळाली होती. त्यांच्या प्रेमानेच यशराज फिल्म्सला सीक्वेल तयार करण्याचा निर्णय घेण्यास प्रेरित केलं आहे. ‘बंटी और बबली 2’ मधील रिअल जोडी म्हणून मला आणि अभिषेकला विचारण्यात आलं होतं, पण काही कारणांमुळे अभिषेक येऊ शकला नाही. पण एक टीम म्हणून आम्ही सैफचं काम करतो. माझ्याकडे त्याच्यासोबत काम केलेल्या सुखत आठवणी आहेत, आणि ‘बंटी और बबली 2’मध्ये काही नवीन प्रयोग करण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आदित्य चोप्रा यांची निर्मिती असलेल्या ‘बंटी और बबली 2’ची शुटिंग सुरू झाली असून वरुण शर्मा हे दिग्दर्शक असणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button