breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही : मुख्यमंत्री येडीयुरप्पा
बेंगळुरू – कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात पडसाद उमटले असताना या वादात आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. एडीयुरप्पा यांनी उडी घेतली आहे. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नसल्याचे एडीयुरप्पा यांनी वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एडीयुरप्पा यांच्या या वक्तव्यामुळे हा वाद अधिक चिघळतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे.
महाजन आयोगानुसार (वादग्रस्त भागांपैकी) कोणता भाग महाराष्ट्राला आणि कोणता भाग कर्नाटकला द्यायचे हे स्पष्ट आहे, असे एडीयुरप्पा म्हणाले. (सीमावादावर) अशा प्रकारचा वाद निर्माण करणे हे योग्य नाही. आम्ही महाराष्ट्राला एक इंच देखील जमीन देणार नाही, असे एडीयुरप्पा यांनी सांगितले.