breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विविध मागण्यासाठी एचए कामगारांचे कंपनी प्रवेशद्वारावर आंदोलन

– प्रश्न सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचे पोलिस प्रशासनाचे आश्वासन; आंदोलन तात्पुरते स्थगित

पिंपरी | प्रतिनिधी
थकित देणी, वेतनवाढ फरक, स्वेच्छा निवृत्ती नंतरचा लाभ न मिळाल्याच्या निषेधार्थ एचए कंपनीतील स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कामगारांनी कंपनी प्रवेशद्वारावर आंदोलन केले. या वेळी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक आयोजित करुन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर कामगारांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

या वेळी शंकर बारणे, संपत पाचुनदकर, श्रीनिवास करंजखेले, संभाजी मुळीक, सुशील शहा, अरुण बोराडे, सुनील पाटसकर, श्याम पत्की, मोरेश्वर थिटे, नंदकुमार अडसूळ, वनिता धिवार, श्रद्धा भोसले, वर्षा गिलबर्ट, लीना चावरिया आदींसह कामगार मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

या बाबत कामगारानी प्रसिद्धिपत्रकद्वारे दिलेल्या महितीत नमूद केले आहे की, कंपनीमधुन ४०० कामगारांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. या कामगारांना १ जानेवारी १९९९ ते ३१ मे २००९ पर्यंतचा वेतनवाढीचा फरक दिलेला नाही. तसेच २०१८ ते २०१९ या दरम्यानचे मेडिकल बिलाची रक्क्म थकित आहे. या बरोबरच विविध थकित देणी व इतर प्रलंबित मागण्याबाबत व्यवस्थापन सकारात्मक विचार करत नाही.

कंपनी व्यवस्थापन देखील दाद देत नाही. २७ जानेवारीची नियोजित बैठकही घेण्यात आली नाही. त्यामुळे कामगारांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी कामगारांनी हे आंदोलन केले. कंपनीच्या एमडी कंपनीत असूनही भेटत नसल्याचा आरोप कामगारांनी केला. या वेळी त्वरित कंपनीच्या व्यवस्थानाशी बैठक लावण्याचे आश्वासन पोलिसांनी कामगारांना दिल. त्यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र पुढे त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा या वेळी कामगारानी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button