breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बारणेंचा विजय म्हणजे नरेंद्र मोदींचा विजय; आमदार जगताप यांच्या हस्ते खासदार बारणेंचा सत्कार

पिंपरी, (महाईन्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयानंतर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (दि. ५) मोरवाडी येथील भाजपच्या शहर कार्यालयाला भेट दिली. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी खासदार बारणे यांना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडाचे रोप भेट देऊन त्यांचे स्वागत केले. आमदार जगताप यांनी खासदार बारणे यांचा झालेला विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असल्याचे सांगितले. निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी उपसलेल्या कष्टामुळे माझा मोठ्या फरकाने विजय झाला. यापुढील विधानसभा, महापालिका निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना आपण मदत आणि ताकद देणार असल्याचे खासदार बारणे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

शिवसेना खासदार बारणे यांनी बुधवारी दुपारी मोरवाडीतील भाजपच्या शहर कार्यालयाला भेट दिली. यावेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पक्षाच्या प्रदेश सदस्य उमा खापरे, महेश कुलकर्णी, राजेश पिल्ले, अमित गोरखे, शहर सरचिटणीस अमोल थोरात, संजय मंगोडेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते.

आमदार जगताप यांच्या हस्ते झाडाचे एक रोप देऊन खासदार बारणे यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर बोलताना आमदार जगताप यांनी खासदार बारणे यांचे दुसऱ्यांदा खासदार झाल्याबद्दल अभिनंदन केले. लोकसभा निवडणुकीत बारणे यांचा झालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झालेला विजय असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकदिलाने काम केले. त्याचा परिणाम म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना खासदार बारणे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. केंद्र सरकारशी निगडीत असलेले पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रत्येक प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी खासदार बारणे यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली.

सत्काराला उत्तर देताना खासदार बारणे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने माझे मनापासून काम केल्याचे सांगितले. भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अपार कष्टामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात माझा मोठ्या फरकाने विजय झाला. आता भाजपला मदत करण्याची माझी वेळ आहे. यापुढील विधानसभा, महापालिका निवडणुका युती म्हणून एकत्र लढताना भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण मदत आणि ताकद देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button