breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हातगाडी, टपरीधारकांचे महापालिकेसमोर आंदोलन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून हातगाडी, टपरीधारकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात असल्याचा आरोप करत नॅशनल हॉकर फेडरेशन,महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे महापालिकेसमोर आज (शुक्रवारी) आंदोलन करण्यात आले.

महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले. प्रदेश संघटक अनिल बारवकर ,कार्याध्यक्ष इरफान चौधरी, महिला विभागाच्या वृषाली पाटणे, वहिदा शेख, सुनंदा चिखले,शमा सय्यद, नंदा तेलगोटे, सुरेश देडे, किरण साडेकर, यासीन शेख,अमृत माने, काशीम तांबोळी, सखाराम केदार, तुकाराम माने,सलीम डांगे, संभाजी वाघमारे ,सय्यद अली ,राजू बोराडे, अमृत माने ,इरफान मुल्ला ,शारदा राक्षे, राजाभाऊ हाके, मनीषा ससाने ,आत्मा गुप्ता ,जयश्री कांबळे, नंदू आहेर ,ओमप्रकाश मोरया, नितीन भराटे, आशा बनसोडे, सीमा गायकवाड, नंदू आहेर, प्रशांत गवई,सूरज देशमाने सुधीर गुप्ता आदींसह शहरातील विक्रेते उपस्थित होते .

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून आठ ही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे. व्यावसायिकांचे साहित्य जप्त केले जात आहे. महापालिका आयुक्त शहरांमध्ये येऊन सहा महिने झाले, तरी अजुन एकही शहर फेरीवाला समितीची बैठक घेतली नाही. मनमानी पद्धतीने कारवाई करण्यात येत असून गरीब विक्रेत्यांचा रोजगार हिरावून घेऊन त्यांना बेरोजगार केले जात आहे. याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. “नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी “, “स्मार्ट सिटी नको रोजीरोटी द्या”, “सनासुदित व्यवसाय हिरावू नका, अशा घोषणा दिल्या.

दरम्यान, आंदोलनानंतर शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी व प्रशासन अधिकारी मुकेश कोळप यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पुढील आठवड्यामध्ये आयुक्त यांचे बरोबर बैठकीचे आश्वासन दिले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button