breaking-newsमुंबई

‘बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची ३५० फूट करा!’

मुंबई – मुंबईत उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची ३५० फूट असून त्यात पुतळा २६० फूट तर चौथरा ९० फुटांचा आहे. पण लोकभावना लक्षात घेऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची २६० फुटांवरून ३५० फूट करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी केली. या बाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

बढत्यांमध्ये आरक्षणासाठी राज्य सरकारने तातडीने वैधानिक उपाययोजना करावी, अशी मागणीही आठवले यांनी केली.   केंद्र सरकारने सवर्णाना २५ टक्के आरक्षण देणारा कायदा करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचेही आठवले म्हणाले. राहुल यांच्याशी पटत नसल्यास पवार यांनी भाजपच्या आघाडीत यावे, असे आवाहनही आठवले यांनी केले.

आंबेडकर-ओवेसी युती फायद्याचीच!

प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमच्या ओवेसी यांची युती झाल्याने रिपब्लिकन पक्षाला फटका बसणार नाही. उलट या युतीचे हार्दिक स्वागत करतो. आंबेडकर-ओवेसी युती आणि भाजप-रिपब्लिकन युतीमुळे काँग्रेसकडे जाणारी मते फुटतील. आमचा फायदाच होईल. फटका मात्र काँग्रेसला बसेल, असे रामदास आठवले म्हणाले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button