breaking-newsमुंबई

राष्ट्रवादीकडून मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे ‘प्रगतिपुस्तक’!

  • धनंजय मुंडे यांची घोषणा; नुसतीच आश्वासने दिल्याचा आरोप

मुंबई – ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्यातील मंत्र्यांच्या पाच चांगल्या कामांचे प्रगतिपुस्तक तयार करण्यात मग्न असले तरी परिस्थिती नेमकी उलटी आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

मंत्र्यांच्या व मंत्रालयातील भ्रष्टाचारामुळे लोक त्रस्त आहेत. आश्वासनांची अनेक गाजरे गेल्या चार वर्षांत दाखविण्यात आली. खड्डेमुक्त रस्त्यांपासून कर्जमाफीपर्यंत अनेक घोषणा झाल्या. मात्र लोकांना अच्छे दिन दिसलेच नाहीत. उलट मंत्रालयाच्या दारापर्यंत आत्महत्यांचे सत्र पोहोचले असून येत्या हिवाळी अधिवेशनात मंत्र्याच्या किमान पाच भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची पुस्तिकाच राष्ट्रवादी पक्षाकडून प्रसिद्ध येणार आहे’, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर केले.

‘अटल भाजप’ची घोषणा भाजपने दिली असली तरी त्या ऐवजी अटल महेंगाई- अटल भ्रष्टाचार हेच आजचे वास्तव चित्र आहे. सर्व पक्षातील भ्रष्ट लोकांना घेऊन पक्ष वाढविण्याचे काम करणाऱ्या भाजपचे अनेक मंत्र्यांच्या कारभारामुळे भाजपची गंगा मैली झाल्याचे मुंडे म्हणाले. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे गृहनिर्माण घोटाळे अधिवेशनात काढण्यात आले होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यापासून ते सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यापर्यंत अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येऊनही त्यांना संरक्षण देण्याचे काम सरकारने केले आहे.

पनवेल येथील कोयना धरणग्रस्तांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याच्या घोटाळ्यापासून नगरविकास विभागातील अनेक प्रकरणे आगामी अधिवेशनात पुस्तिकेच्या माध्यमातून आम्ही प्रसिद्ध करू असे  धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button