breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाऱ्यामुळे घरावरील छप्पर उडालं, सात महिन्याच्या बाळासह मातेला दुखापत, घराचेही मोठे नुकसान

नंदुरबार: जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले नसले, तरी काही भागात सोसाट्याचा वारा वाहू लागला आहे. तळोदा तालुक्यातील सीतापावली या गावात गोविंद ठाकरे या शेतकऱ्याचे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावरील सिमेंटचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. या घटनेत सात महिन्याचं बाळ आणि त्याच्या आईला किरकोळ दुखापत देखील झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील सितापावली या ठिकाणी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गोविंद ठाकरे यांच्या घरावरील छप्पर पूर्णपणे हवेत उडून गेल्याने घरातील धान्य आणि घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात महत्त्वाची कागदपत्रे देखील उडून गेली आहेत. तसेच घरात असलेले सात महिन्याचे बाळ आणि आईला किरकोळ दुखापत झाली आहे.

the roof of the house was blown off by the wind

वाऱ्यामुळे घरावरील छप्पर उडालं

पंचनामा करून मदत देण्याचं आश्वासन

यावेळी संबंधित ग्रामपंचायतीच्या तलाठी कविता पारचूरे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन पंचनामा करून मदत दिली जाणार अशी माहिती दिली आहे. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घरावरील छप्पर उडून निवाऱ्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने तत्काळ मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त परिवाराने केली आहे.

भाजप ग्रामीणच्या कार्यकर्त्यांची मदत

नुकसानग्रस्त परिवाराची हालाखीची परिस्थिती पाहून तळोदा भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण कार्यकर्त्यांच्यावतीने नुकसानग्रस्त कुटुंबाला पाच हजार रुपयांची रोख मदत करण्यात आली आहे. महसूल विभागाने देखील कार्यवाही करून लवकर मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी गोविंद ठाकरे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button