breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बाबासाहेबांचं २५० ऐवजी ३५० फुटांचं स्मारक उभारणार – अजित पवारांची घोषणा

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाविषयी महत्त्वाची घोषणा केलीय. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विषय कॅबिनेटमध्ये आल्यानंतर जवळपास ११०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आता या स्मारकाची उंची वाढवणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

डॉ. आंबेडकर स्मारकाची उंची वाढवणार असून आता २५० फुटांऐवजी ३५० फूटांचं भव्य स्मारक उभारणार, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय. स्मारकाचा खर्च ३०० कोटींनी वाढणार असल्याचं सांगतानाच कांस्य धातू वापरून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारलं जाईल, असंही त्यांनी सांगितलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button