breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

१५ लाखांचा इनाम असलेल्या ‘हिजबुल’च्या कमांडरचा खात्मा

जम्मू-काश्मीर | महाईन्यूज

जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे आज जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या जिल्हा कमांडर हारुण हफाज याचा खात्मा केलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी चंद्रकांत शर्मा व त्यांच्या सुरक्षारक्षाकसह किश्तवाड येथील परिहार बंधुंचा हारुण हफाज हा हत्यारा आहे.अनेक दिवसांपासून हारुण हफाजचा शोध सुरू होता. पोलिसांनी त्याच्यावर तब्बल १५ लाख रुपायांचा इनाम देखील ठेवलेला होता. या कारवाईनंतर परिसरात अन्य देखील दहशतवादी लपून बसलेले असल्याची शक्यता असल्याने, जवानांकडून संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबलवी जात आहे.

काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन आलेला असताना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तीन संशयीत दहशतवाद्यांना देखील ताब्यात घेतलेले आहे. ख्वाजा मोइद्दीन, अब्दुल समद आणि सय्यद अली नवाज अशी त्यांची नावं असल्याचे समोर आले आहे. दिल्ली-एनआरसी किंवा उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा ते कट रचत असल्याची माहिती समोर आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button