breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बाप्पाच्या विसर्जनासाठी आता घरादारी खास ‘विसर्जन रथ’

देशभरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी बाप्पाच्या आगमानाची धामधूम पाहायला मिळणार नाहीये..तरीही घरातल्या घरात तरी बाप्पाच्या स्वागताची साधेपणाने का असेना पण जोरदार तयारी सुरु आहे. कोरोनामुळे जशी आगमनासोबतच बाप्पाच्या विसर्जनाबाबत ज्येष्ठ नागरिकांमध्येही संभ्रम आहे. गणपतीचे विसर्जन करायचे कसे असा प्रश्न भेडसावत असताना त्यांच्या मदतीला धावून आले आहे भारतीय जनता युवा मोर्चा. या संघाने ‘विसर्जन आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम सुरु केला असून यासाठी खास विसर्जन रथ बनवला आहे. ज्यात कृत्रिम तलाव बनवण्यात आला आहे.

या विसर्जन रथाचे वैशिष्ट्य म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक मुंबईत एकटे राहतात आणि ज्यांच्या घरी गणपती असतो. अशा नागरिकांसाठी या रथात खास कृत्रिम तळ बनविण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने नागरिकांना आपल्या दारातच या रथातील तळ्यात आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करता येणार आहे.

सध्या कोरोना व्हायरसमुळे खबरदारी म्हणून अनेक ज्येष्ठांना घराबहेर पडता येत नाही आहे. यामुळे ऑनलाईन गणेश मूर्ती ही सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे अन्य नागरिकही सोशल डिस्टंसिंगचे भान राखत ऑनलाईन गणपती बुक करु शकता. मात्र त्याचे विसर्जन कसे करणार असा प्रश्न अनेक ज्येष्ठ नागरिकांना पडला होता. त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव आम्ही हा उपक्रम राबविणार असल्याचे BJYM च्या प्रमुखांनी सांगितले.

यासाठी रोज ट्रान्सपोर्ट करिता वापरण्यात येणारे ट्रक फुलांनी छान सजविण्यात आले आहेत. ज्यात गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तळं बनविण्यात आले आहे. त्यामुळे दीड दिवस, पाच दिवस, 7 दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी हा रथ वापरण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button