breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोना विषाणूमुळे भारतीय हिरे व्यावसायिकांना मोठा फटका…

कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये असलेल्या मोठ- मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यापारास फटका बसला आहे. याचे  नकारात्मक परिणाम आता भारतीय हिरे व्यावसायिकांना देखील सहन करावे लागत आहेत.  येत्या दोन महिन्यांत कोरोनामुळे भारतीय हिरे उद्योगाला जवळपास ८ ते  १० हजारांचा फटका बसणार असल्याची भीती सुरत मधल्या हिरे व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे…

भारतातून जवळपास ९५% पॉलिश केलेले हिरे  निर्यात केले जातात. त्यातील सर्वाधिक हे हाँगकाँग आणि चीनमध्ये निर्यात होतात. हाँगकाँग आणि चीनमध्ये एकूण ४१% हिरे निर्यात केले जातात. जवळपास ४५ हजार कोटींचा हा व्यवसाय आहे. मात्र कोरोनामुळे चीन, हाँगकाँगमध्ये असलेले व्यापारी परतत आहे. पुढील महिन्यात इथे मौल्यवान खडे, हिऱ्यांचे अनेक प्रदर्शन होणार आहेत मात्र अनेक प्रदर्शनं रद्द करण्यात आली आहेत, त्यामुळे हिरे व्यापाराला याचा मोठा फटका  बसलाय…

कोरोनामुळे चीनमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर झाली आहे. इथे  कोरोनामुळे हजारो लोक बाधित झाले आहेत. तर जवळपास ६०० लोकांचे जीव आतापर्यंत गेले आहेत. या आजाराचं नेमकं कारण अद्यापही समोर  आलेलं नाही, तसेच या आजारावर ठोस उपायही समोर आलेला नाही. जगभरातील अनेक देशांनी चीनमध्ये कामानिमित्तानं वास्तव्यास असलेल्या त्यांच्या देशातील नागरिकांना मायदेशी परत आणले आहेत. अॅपलसारख्या अनेक मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी आपल्या कंपन्या बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे.

जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन  कौन्सिलचे अध्यक्ष दिनेश नवाडिया यांनीदेखील एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत नुकसान सहन करावं लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button