breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शिखर बॅंक घोटाळ्याशी शरद पवार साहेबांचा काय संबंध?, एकनाथ खडसेचा सवाल

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य सहकारी अर्थात शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रकरणाशी देणे घेणे नसणाऱ्यांवर गुन्हे कसे, असा सवाल उपस्थित करत एकनाथ खडसे यांनी एका प्रकारे शरद पवार यांची पाठराखण केली आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनीच हे प्रकरण उघडकीस आणले होते. तेव्हा एकनाथ खडसे हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते.

शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणात पवारांचे नाव समोर आल्यामुळे एकनाथ खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शरद पवार यांचे नाव जबरदस्ती प्रकरणात गोवून गुन्हा दाखल करणे म्हणजे समजायला मार्ग नाही. या प्रकरणाशी ज्यांचा काही संबंध नाही, देणे घेणे नाही त्यांच्या नावाने ईडी कसे काय गुन्हा दाखल करते, असा सवाल देखील खडसे यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button