breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुण्यातील शैक्षणिक संस्थाना नाममात्र दराने जागा द्या; भाजप आमदारांची मागणी

पिंपरी। महा ई न्यूज ।

पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे एक लाख विद्यार्थी पुण्यातील विविध नामाकिंत शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांना दररोज ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे नवनगर विकास प्राधिकरणाकडून पुण्यातील नामाकिंत शैक्षणिक संस्थाना नाममात्र दरात जागा उपलब्ध करुन द्याव्यात, जेणेकरुन विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षण घेता येईल, त्यांची गैरसोय दुर होईल, अशी आग्रही मागणी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. यावेळी नवनगर प्राधिकरणाचे मोकळे भूखंड शैक्षणिक संस्थाना भाडेकराराने द्यावेत, अशा सुचना प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांना केली.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) कामाचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी आज (शुक्रवारी) आढावा घेतला.  यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीसीएनटीडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव, नगरसेवक नामदेव ढाके, प्रमोद निसळ आदी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ”त्रिवेणीनगर येथील स्पाईन रोडचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. तो प्रश्न मार्गी लावावा. त्याचा चांगला उपयोग होईल. महापालिका प्राधिकरणाला पैसे देईल. प्राधिकरणाने जागा उपलब्ध करुन द्यावी. शहरातील सुमारे 1 लाख मुले पुण्यात शिक्षणासाठी जातात. त्यासाठी प्राधिकरणाने नामांकित शैक्षणिक संस्थांना नाममात्र दरात जागा द्यावी. शैक्षणिक संस्था शहरात झाल्यास पुण्यातील गर्दी कमी होईल” अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button