breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धर्मवीर संभाजी महाराज उद्यानाचे लवकरच नूतनीकरण

  • प्रभागाध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांनी उद्यानाचा घेतला आढावा

पिंपरी / महाईन्यूज

रहाटणी येथील महापालिकेच्या धर्मवीर संभाजी महाराज उद्यानाचे लवकरच नूतनीकरण व सुशोभीकरण होणार असून या सुशोभीकरणामुळे उद्यानाचे रुपडे पालटण्यास हातभार लागणार आहे.

महापालिकेचे ग प्रभाग अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक बाबसाहेब त्रिभुवन यांनी सोमवारी सहाय्यक आयुक्त व ग प्रभाग क्षेत्रीय आधिकारी श्रीनिवास दांगट यांच्यासमवेत या उद्यानास भेट दिली. उद्यानात होत असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाचा आढावा घेतला.

यावेळी स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, सहाय्यक उद्यान आधिक्षक जयदेव पटेल आदींसह उद्यान व स्थापत्य विभागाचे अन्य आधिकारी उपस्थित होते. यावेळी त्रिभुवन यांनी उद्यान अधिकार्‍यांशी चर्चा करून उद्यानामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार्‍या विविध सोयीसुविधांची माहिती घेतली.

उद्यानात जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विरंगुळा केंद्राचीही पाहणी केली. या विरंगुळा केंद्राची नियमित देखभाल करण्याच्या सुचना दिल्या. लहान मुलांसाठी असलेली खेळणी चांगल्या स्थितीत आहेत का याची शहानिशा करून नादुरुस्त खेळण्यांची दूरस्ती करण्याबाबतचे आदेशही त्रिभुवन यांनी दिले.

उद्यानात बनविण्यात येणार्‍या बॅडमिंटन खेळासाठीच्या सिंथेटिक कोर्ट तसेच अन्य नूतनीकरणाची कामे वेळेवर पूर्ण करण्यात येणार आहेत. सुशोभीकरणामुळे उद्यानाच्या सौंदर्यात नक्की भर पडेल, अशी भावना नगरसेवक त्रिभुवन यांनी यावेळी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button